रात्रीची तलावपाळी

मी सूर्य आहे… इथे नसलो तरी कुठेतरी आहेच.



अंधाराचा गर्भ
फोडणारा हा मानवी
प्रकाश खूप काही
सांगून जातो…
कुणीतरी म्हणतो
ह्या झगमगाटाचे
बटन आमच्या हातात आहे..
पण लक्षात घ्या उद्याचा सूर्य
हे पण सांगून जातो..
त्या बटणाचा कुठलाही मी पणाचा अहंकार करू नकोस
नको करू माणसा
मी सूर्य आहे…
इथे नसलो तरी
कुठेतरी आहेच….

— सतीश चाफेकर.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →