पुस्तके घडवी जीवन

लेखिका – अंजना कर्णिक  – वाचक दिनानिमित्त कविता



“आम्ही साहित्यिक” या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपच्या लेखिका अंजना कर्णिक यांची वाचक दिनानिमित्त कविता


बालपणापासून आपुले
पुस्तके घडविती जीवन
आवडीने वाचन
करावे

संस्काराचे शिंपण
मनाचे करिती रंजन
अज्ञान निर्मूलन
पुस्तकांमूळे

दसरा शुभमुहूर्ती
श्री गणेशा पाटीवरती
बालक गिरविती
अक्षरे

दोस्ती अक्षरांशी
गट्टी करावी पुस्तकांशी
गोष्टी ,कविताशी
मैत्री

संतसाहित्य चरित्र
रामायण अन महाभारत
बिरबलकथेची गंमत
अाठवावी

शास्रग्रंथ वाचन
वैद्यकीय लेखांचे स्मरण
टळते मरण
स्वानुभव

लोट दु:खाचे
पुस्तके लाविती परतुन
असता निराश
खुलविती

अर्मयाद थोरवी
रचनेत कशी मावावी
पुस्तके बरवी
जीवनात

©® – अंजना कर्णिक

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29615 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →