साहित्य: – कव्हरचे साहित्य: -२ वाट्या मैदा, अर्धा चमचा दही, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे तेल.
सारणाचे साहित्य: -१ वाटी उडीद डाळ,
१ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, १ चमचा धनेपूड, चिमूटभर हिंग, १ चमचा खसखस, १ चमचा बडिशेप १ चमचा लाल तिखट, तळण्याकरिता तेल,
कृती: – उडीद डाळ ५-६ सहा तास भिजवून पाणी निथळून कोरडी करावी. नंतर जरा जाडसर वाटावी. खसखस, बडिशेप, भाजून त्याची पूड करावी. वाटलेल्या उडीद टाळीवर खसखस बडिशेप पूड, मीठ, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला घालून एकजीव करावे. हे मिश्रण गरम केलेल्या कढईत थोड्या तेलावर बदामी रंगावर परतावे.
मैद्यात, दही, थोडे मीठ, २ चमचे तेल घालून ते एकत्र करून घट्ट भिजवावे व २ तास तसेच ठेवावे. मैद्याच्या छोट्या गोळ्या करून पाऱ्या लाटाव्यात. त्यात चमचाभर सारण भरून तोंड बंद करावे. आकार गोल असावा. मंद आचेवर बदामी रंगावर तळाव्या. चिंचेच्या चटणीसोबत किंवा पुदिना चटणीसोबत खाण्यास द्याव्या.