प्रेम झरा

नाही गेली अटूनी माया आजही वाहते झऱ्यासारखी

उगांच कां तू खंत करशी न होशील मज पारखी ।।१।।

वाहत असता फुटले फाटे जीवनातील वळणावरी

जो तो घेई उचलूनी वाटा नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।

कसा राहील 'साठा' आता मनसोक्त ते जाण्या वाहूनी

तृप्त करिल परी तृष्णा तुझी ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।

कुणीतरी आहे पाठीराखा चालत रहा तू आनंदानी

आखंडीत मी प्रेम झरा थकूनी जाता देईल पाणी ।।४।।

-- डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

नाही गेली अटूनी माया आजही वाहते झऱ्यासारखी

उगांच कां तू खंत करशी न होशील मज पारखी ।।१।।

वाहत असता फुटले फाटे जीवनातील वळणावरी

जो तो घेई उचलूनी वाटा नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।

कसा राहील ‘साठा’ आता मनसोक्त ते जाण्या वाहूनी

तृप्त करिल परी तृष्णा तुझी ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।

कुणीतरी आहे पाठीराखा चालत रहा तू आनंदानी

आखंडीत मी प्रेम झरा थकूनी जाता देईल पाणी ।।४।।

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author