प्रेम श्रद्धेचा दिव्य संगम

प्रेम जिथे निःस्वार्थ फुलते, तिथे विठ्ठल हसरा दिसे,
श्रद्धेच्या त्या निर्मळ ओंजळी, रुक्मिणीचे प्रेम वसे.

नसती तिथे शब्दांची भाषा, डोळेच बोलती साऱ्या कथा,
एका स्पर्शात विश्व सामावे, प्रेमच ठरते जीवनव्यथा.

अहंकाराचे गळुनी बंधन, मन जेव्हा निर्मळ होते,
विठ्ठलनामाच्या गजरामध्ये, भक्तीचे गगन उजळते.

सुख-दुःखाच्या प्रत्येक वाटे, हातामध्ये हात असावा,
रुक्मिणीच्या अढळ श्रद्धेने, विठ्ठल अंतरी नांदावा.

प्रेम म्हणजे देह नव्हे रे, आत्म्याचा तो श्वास असतो,
श्रद्धेच्या अखंड ज्योतीमधुनी, जीवनाचा प्रकाश फुलतो.

करुणा, क्षमा, समर्पण जेथे, देवत्व तेथे जागे होते,
प्रेम तिथे विठ्ठल नांदतो, श्रद्धा रुक्मिणी रूपे फुलते.

पंढरी दूर नसते कधीच, भाव जर अंतरी शुद्ध असे,
प्रेमाच्या त्या पवित्र मंदिरात, विठ्ठल-रुक्मिणी सदैव वसे.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
मो:- 9011841212

Author