प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी,
वाटत असते ,तुमच्या मनीं ।
अपेक्षा करता प्रेमाची,
सदैव इतरांकडूनी...१,

सहानूभुतीचा शब्द लागतो,
दैनंदिनीच्या जीवनीं ।
क्षणा क्षणाला भासत असते,
जीवन तुमचे अवलंबूनी...२,

प्रेम वाटतां इतरांना,
परत मिळते तेच तुम्हांला ।
प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी
चलनांत ठेवा हर घडीला...३,

याच नाण्यांनीं काम बनते,
चटकन सारे बघा कसे ।
दोन मनें सांधली जाऊनी,
आनंद सर्वत्र दिसत असे...४,

राग लोभ हे शत्रू आपले,
घालऊनी द्यावे तुम्ही त्यांना ।
प्रेम नाण्याची मदत घेता,
सहज जमेल हे सर्वांना...५,

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



तसेंच वागा इतरजणांशी,
वाटत असते ,तुमच्या मनीं ।
अपेक्षा करता प्रेमाची,
सदैव इतरांकडूनी…१,

सहानूभुतीचा शब्द लागतो,
दैनंदिनीच्या जीवनीं ।
क्षणा क्षणाला भासत असते,
जीवन तुमचे अवलंबूनी…२,

प्रेम वाटतां इतरांना,
परत मिळते तेच तुम्हांला ।
प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी
चलनांत ठेवा हर घडीला…३,

याच नाण्यांनीं काम बनते,
चटकन सारे बघा कसे ।
दोन मनें सांधली जाऊनी,
आनंद सर्वत्र दिसत असे…४,

राग लोभ हे शत्रू आपले,
घालऊनी द्यावे तुम्ही त्यांना ।
प्रेम नाण्याची मदत घेता,
सहज जमेल हे सर्वांना…५,

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author