पोवाडा

माझा भारत महान हो हो
माझा भारत महान।।
किती गाऊ महती याची ,अपुरे माझे शब्द पडती हो जी जी जी।।धृ।।

उत्तुंग इथल्या पर्वत रांगा
ढाल माझ्या देशाची।।
नद्या वाहती झुळझुळ इथल्या
सुफलाम् रुपे वसुंधरेची हो जी जी जी।।१।।

रक्षणार्थ भुमातेच्या शहीद झाली
सुपुत्र माझ्या भारतीची।।
झुंझारलेली शक्तीपिठे गौरवशाली
गीत गाती पराक्रमाची हो
जी जी जी।।२।।

राम-कृष्ण दैवत इथले
धडे शिकविती कर्तृत्वाची
स्वराज्य अन् सुराज्य असो कथा सांगे शिवबा-राणी लक्ष्मीची हो जी जी जी
।।३।।

विविधेत एकता इथली
नांदते धरेवरी
तिला कोंदणं मानवी संस्कृतीची।।
मोडेन पण नाही झुकणार
बाणा बाणती लेकरे या मातीची हो जी जी जी।।४।।

सौ.माणिक शुरजोशी
नाशिक



माझा भारत महान हो हो
माझा भारत महान।।
किती गाऊ महती याची ,अपुरे माझे शब्द पडती हो जी जी जी।।धृ।।

उत्तुंग इथल्या पर्वत रांगा
ढाल माझ्या देशाची।।
नद्या वाहती झुळझुळ इथल्या
सुफलाम् रुपे वसुंधरेची हो जी जी जी।।१।।

रक्षणार्थ भुमातेच्या शहीद झाली
सुपुत्र माझ्या भारतीची।।
झुंझारलेली शक्तीपिठे गौरवशाली
गीत गाती पराक्रमाची हो
जी जी जी।।२।।

राम-कृष्ण दैवत इथले
धडे शिकविती कर्तृत्वाची
स्वराज्य अन् सुराज्य असो कथा सांगे शिवबा-राणी लक्ष्मीची हो जी जी जी
।।३।।

विविधेत एकता इथली
नांदते धरेवरी
तिला कोंदणं मानवी संस्कृतीची।।
मोडेन पण नाही झुकणार
बाणा बाणती लेकरे या मातीची हो जी जी जी।।४।।

सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Author