परतलेले सुरणकाप

परतलेले सुरणकाप – Recipe



साहित्य: – पाव किलो सुरण, १ मोठा चमचा तूप, १ चमचा चिंचेचा कोळ,

अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा पिठीसाखर.

कृती :- प्रथम सुरण कुकरमध्ये उकडून घ्यावा. नंतर त्याचे साल काढावे. ते सहज निघते. सुरणाचे लांबट चौकोनी तुकडे कापावेत. गरम तुपात ते चांगले लालसर होईपर्यंत परतावेत.

एका बाऊलमधे ते ठेवून त्यात चिंचेचा कोळ, मीठ, मिरपूड, गरम मसाला, पिठीसाखर घालून चांगले ढवळावे म्हणजे मसाला प्रत्येक तुकड्यास सर्व बाजूंनी लागेल. गरमच सर्व्ह करावा.

Author