पंख फुटता !

ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी ।

आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी ।।१

माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती ।

हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती ।।२

जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी

नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी ।

परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता ।

टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author