पालकाचे सूप

साहित्य: १ जुडी पालक, ३ टोमॅटो, वेळ: २० मिनिटे १ लहान कांदा, २ टे. स्पून 'अमूल' बटर, अर्धा कप फेटलेले क्रीम (मलई), पाव टी स्पून मीठ, मिरे पावडर.

कृती: पालक कोवळ्या देठासह निवडून, स्वच्छ धऊन बारीक चिरा. कांदा बारीक चिरा, टोमॅटोच्या फोडी करा. एका मोठ्या भांड्यात थोडेसे बटर घालून त्यात कांदा मऊ होईपर्यंत परता. नंतर त्यात पालक आणि टोमॅटो घाला व ३-४ कप पाणी घालून उकळत ठेवा. चांगल्या उकळ्या आल्या की गॅस बंद करून सर्व मिश्रण पाण्यासहित मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करा. मोठ्या गाळणीने सर्व मिश्रण गाळा. जरूर वाटल्यास पुन्हा थोडे पाणी वापरा व बेताचे दाटसर सूप तयार करा. गॅसवर उकळत ठेवा. मीठ, मिरेपावडर घालून उकळत असताना त्यात उरलेले बटर घालावे. हे गरम-गरम सूप बाऊलमध्ये घातल्यावर त्यावर फेटलेले क्रीम १- १ टी स्पून घाला.

साहित्य: १ जुडी पालक, ३ टोमॅटो, वेळ: २० मिनिटे १ लहान कांदा, २ टे. स्पून ‘अमूल’ बटर, अर्धा कप फेटलेले क्रीम (मलई), पाव टी स्पून मीठ, मिरे पावडर.

Author