पालक पार्सल

पालक पार्सल – Recipe



साहित्य: -५ उकडून कुस्करलेले बटाटे, १ मध्यम आकाराचे किसून शिजविलेले गाजर, १ वाटी किसून शिजवलेला कोबी, पाऊण कप किसलेले चीज, १ बारीक चिरलेली पार्सली, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, ४ लसूण पाकळ्या (ठेचलेल्या), १ मोठा चमचा पाणी, ८-१० पालकाची मोठी पाने, अर्धा चमचा मिरपूड, चवीप्रमाणे मीठ.

कृती: -पालकाची पाने सोडून सर्व साहित्य एका बाऊलमध्ये एकत्र करून हातानेच जरा मळून घ्यावे. पालकाचे पान एका ट्रेमध्ये पसरावे. त्यावर वरील मिश्रण ३

चमचे घालून थोडे दावावे. नंतर पालकाच्या पानांची गुंडाळी करून त्यास टूथपिक टोचावा. अशी आठ ते दहा पार्सल्स करावीत. एका पॅनमध्ये थोडे लोणी गरम करून त्यावर ही पार्सल्स ठेवून झाकण ठेवावे. एक मिनिटाने आच बंद करावी. वाफेवर पालकाची पाने अर्धवट शिजतात. एका डिशमध्ये ही पार्सल्स ठेवावीत. प्रत्येक पार्सलवर अर्धा चमचा टोमॅटो सॉस टाकावे. ही पार्सल खाण्यास छान लागतात.

Author