गाई वळल्या घरी
पाखरे बघ गेली कोटरी ।। धृ. ।।
‘दिवेलागणी देवाघरची
झाली गगनांतरी
पाखरे बघ गेली कोटरी ।॥॥९॥।
उड्या मारिता धावत जाता.
हरणे आली घरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।॥२॥।
चंचु चंचु हे एक मिळाले
निजली वृक्षावरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।३।।
रजनी आली रिझवायाला
ही चंद्राच्या घरी.
पाखरे बघ गेली कोटरी ।॥४॥।
शांत शांत ही अंगाईची
अंगुलि फिरते शिरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।५॥।
चिऊमाउच्या गोष्टी कथिता
बाळे निजली घरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।६॥।
Post Views: 7