(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

एक परीस स्पर्श ( भाग – ३५ )

ID: 22608
विजय कोकणातील त्याच्या गावी जाऊन माघारी आला तरी त्याचा पाय काही दुखायला थांबला नव्हता. विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. कारण अजूनही त्याला पाय खेचत चालावे लागत होते आणि पायऱ्या चढता उतरताना प्रचंड त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर त्याच्या गुरूंचे त्याचे या महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की येणारा काळ जरी त्याच्यासाठी संघर्षाचा असला तरी यश घेऊन येणारा आहे. त्यामुळे विजय थोडा आनंदातच होता. त्यात तो जो नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचार करत होता म्हणजे! त्याची छोट्या तत्वावर त्याने सुरुवातही केली होती. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22608)

pd - July 29, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ३६ )

ID: 22610
विजयला आता त्याच्या आयुष्यात त्याच्या मर्जीने त्याच्या मर्जीचे असे काहीतरी करायचे होते कारण आता पर्यत विजय त्याच्या आयुष्यात जे काही करत आला ते इतरांसाठी. पण त्या इतरांनी त्याच्यासाठी कधीच काही केले नव्हते आणि भविष्यात करतील अशी त्याला आशाही नव्हती. विजयच्या मनात त्या मालकाविषयी काही राग वगैरे नव्हता कारण तो आयुष्यभर व्यवहारानेच वागत आला पण विजयला व्यवहार जमला नाही. ना त्याच्या कारखान्यात, ना कुटुंबात आणि ना त्याच्या आयुष्यात. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22610)

pd - July 30, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४१ )

ID: 22612
विजय आज त्याच्या कार्यालयात बसून संगणकावर काम करत होता... इतक्यात त्याचे एक मित्र बऱ्याच महिन्यांनी त्याला भेटायला आले... ते मित्रही साहित्यिक असल्यामुळे विजय आणि त्यांच्या चर्चा रंगणारच होत्या. विजयने बोलायला सुरुवात केली तोच ते म्हणाले," माझी बायको वारली एक महिन्यापूर्वी ! ते ऐकून विजयला धक्काच बसला ! त्या मित्राचे वय असेल साधरणतः ५० वर्षे, म्हणजे त्यांची पत्नी असेल पंचेचाळीसची वगैरे, त्यामुळे त्या इतक्या कमी वयात वारल्याचे ऐकून विजयला धक्काच बसला ! विजय काही त्यांना कधी प्रत्यक्षात भेटला नव्हता त्यामुळे त्यांच्या एकूणच तब्बेतीबद्दल विजयला काही माहिती नव्हती. पण ! यापूर्वी विजयाच्या त्या मित्राच्या बोलण्यात कधी त्यांच्या तब्बेतीचा विषय निघाला नव्हता म्हणजे त्या फार पूर्वी पासून आजारी वगैरे असण्याची शक्यता कमीच होती.. त्यामुळे विजयने थोडं गंभीर होतच त्यांना प्रश्न केला,'' कशा वारल्या ? काय झालं होत ?? त्यावर ते मित्रही गंभीर होत म्हणाले, [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22612)

pd - August 9, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४२ )

ID: 22614
एका ६१ वर्षीय प्रियकरचा ४० वर्षीय प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू...ही बातमी विजयच्या वाचनात आली...कोणाच्याही, कोणत्याही कोणत्याही कारणाने झालेल्या मृत्यूची बातमी वाचल्यावर प्रथम वाईटच वाटते.. पण थोड्यावेळाने आपण त्या बातमीकडे बातमी म्हणून पाहायला लागतो...या बातमीत सर्वात पहिली गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या वयातील २० वर्षाचे अंतर आणि पुरुषाचे प्रेमात पडण्याचे वय...पाहता...प्रेमाला कोणती बंधने नसतात ही गोष्ट लक्षात येते... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22614)

pd - August 10, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४३ )

ID: 22616
विजयच्या आयुष्यात काय ? कोणाच्याच आयुष्यात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही ! यावर विजयचा ठाम विश्वास होता. विजयचा पाय दुखणे ! तो ही सलग चार महिने ! कोणत्याच उपचारालाही प्रतिसाद न मिळणे . ही विजयला एक सामान्य घटना नक्कीच वाटत नव्हती... या चार महिन्यात विजयासह अनेकांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्या चार महिन्यांमुळे अनेक घटना घडणार होत्या. विजयला सध्या तो जी नोकरी करत होता ती नोकरी त्याला सोडायचीच होती पण ती सोडायला काही ठोस कारण मिळत नव्हते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22616)

pd - August 11, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४४ )

ID: 22618
मे महिना संपला की सर्वाना वेद लागतात ते पावसाचे ! पाऊस हा कवींसाठी थोडा विशेषच असतो कारण प्रत्येक कवीने पावसावर एकतरी कविता लिहिलेली असतेच ! विजयने पावसावर आतापर्यत दहा- बारा कविता तरी लिहिल्या होत्या. त्यात त्याची सर्वात आवडती कविता होती तर पावसात भिजताना ! ज्या कवितेत प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची कल्पना करत असतो. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22618)

pd - August 12, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४५ )

ID: 22620
विजय आज कोणत्यातरी मालिकेचे प्रमो ! पाहत होता. ज्यात एक नवरा आपल्याला हीच पत्नी सात जन्म मिळावी म्हणून वडाला प्रदक्षिणा घालताना दाखविला होता. तो प्रमो ! पाहून विजयला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं कारण कालच विजय त्याच्या एका मित्राला त्याच्या कारखान्यात भेटायला ,. गेला होता... तो मित्र विवाहित आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगाही आहे. बायकोही दिसायला खूप सुंदर ! सुंदर म्हणजे इतकी सुंदर की एखाद्या शिल्पातील स्त्री जितकी सुंदर असते तितकी ! तरी तो माणूस बाहेरून येणाऱ्या - जाणाऱ्या मुली डोळे फाडून पाहत असतो...बोलता - बोलता त्याने लग्नानंतरही एक मुलगी कशी त्याच्या गळ्यात पडत होती त्याची रसभरीत कहाणी सांगितली [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22620)

pd - August 13, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४६ )

ID: 22622
विजय कोठेही असला तरी त्याचे डोळे आणि कान सताड उघडे असतात. लोकांच्यात होणारे संभाषण हे तर त्याच्या कविता, कथा आणि लेखांचे खाद्य असते. लेखक ,कवी असो अथवा पत्रकार त्यांना सतत लोकांच्या भाव - भावनांचा विचार करत राहावे लागते. काही दिवसापूर्वी विजय बसने प्रवास करत होता. प्रवासात दोन स्त्रियांचा संवाद त्याच्या कानावर पडत होता... बायका तश्या बऱ्यापैकी सुशिक्षित दिसत होत्या म्हणजे त्यांच्या बोलण्यात येणाऱ्या सततच्या इंग्रजी शब्दावरून ते लक्षात येत होते. त्या बायका कमीत कमी दहावी - बारावी पर्यत नक्कीच शिकलेल्या असाव्यात. त्यातील एक तर इतकी व्यवस्थित होती कि ती नक्कीच कोणत्यातरी कार्यालयात कामाला असावी अशी वाटावी. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22622)

pd - August 14, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४७ )

ID: 22624
आज सकाळी विजय त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी त्याच्या इमारतीतून बाहेर पडला. त्याच्या हातात पाण्याने भरलेल्या दोन बाटल्या होत्या. इमारतीच्या खाली त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले त्याच्या हातातील पाण्याच्या बाटल्या पाहून ते म्हणाले, " ह्या बाटल्यांची हमाली उगाच कशाला करतोस ? त्यावर विजय त्या गृहस्थाला म्हणाला, '' महिनाभर जर मी पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन पाणी प्यायलो तर १२०० रुपये होतील आपल्या इमारतीचा मेंटेनन्स फक्त ८०० रुपये आहे. विजयचे हे उत्तर ऐकून तो गृहस्थ गप्पच बसला. विजयने जो विचार केला होता तो विचार त्या गृहस्थाने स्वप्नातही केलेला नसेल. विजय नेहमीच इतरांपेक्षा वेगळा विचार करतो म्हणूनच कोणी त्याच्या तोंडाला लागत नाही कारण त्याच्या प्रत्येक कृतीचे त्याच्याकडे कोणालाही पटेल असे स्पष्टीकरण असते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22624)

pd - August 15, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४८ )

ID: 22626
विजयला राजकारण कितीही आवडत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्यात त्याला रस नाही... सक्रिय राजकारणात जाण्याची संधी त्याला अनेकदा चालून आली होती. त्यावर त्याचे स्पष्ट मत असते मला गल्लीतील राजकारणात रस नाही...  म्हणजे त्याला छोटा विचार करायला आवडत नाही असा आहे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22626)

pd - August 26, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ४९)

ID: 22628
त्याने स्वतःपेक्षा अधिक प्रेम कधीच कोणावर केले नाही अगदी अनामिकावरही नाही... त्याने तिच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही. तिलाही त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ करून दिली नाही. यापूर्वी त्याचे जिच्या जिच्यावर प्रेम होते तिच्या आयुष्यातही त्याने कधी  ढवळाढवळ केलेली नव्हती. त्याच्या मनात त्याच्याबद्दल यकिंचितही तिरस्कार नव्हता कारण त्याने तेच केले होते जे त्याला हवे होते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22628)

pd - August 27, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ५ )

ID: 22630
विजयने मांसाहार बंद केल्यानंतर पूर्वी त्याला होणारे पोटाचे त्रास बऱ्याच अंशी कमी झाले. सर्वात म्हणजे विजय रागावर विजय मिळविण्यात यशस्वी झाला. आता तर त्याच्या स्वभावात प्रचंड साधेपणा आलेला आहे इतका की एकेकाळी तो साक्षात जमदग्नीचा अवतार होता हे कोणाला सांगूनही खरं वाटत नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22630)

pd - January 25, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ५०)

ID: 22632
काही दिवसापूर्वी विजयने एका किर्तनात एक कथा ऐकली ती कथा अशी होती की एका गावात एक मोठे साधू महाराज येतात.. त्या गावातील लोक खूपच धार्मिक असतात ते त्या साधूना लोक वर्गणीतून एक आश्रम बांधून देतात .. त्यावर ते साधू महाराज मानत विचार करतात या गावाने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपल्याला करायला हवी म्हणून ते त्या गावकऱ्यांना सांगतात तुम्ही मला तुमच्या गावातील पन्नास विद्यार्थी द्या मी त्या पन्नास विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिकवून ज्ञानी करेन त्याप्रमाणे गावकरी ४९ विद्यार्थी जमा करतात पण एक विद्यार्थी कमी पडत असतो. त्या गावात एक मुलगा असतो तो फक्त खात असतो आणि झोपत असतो. गावकरी विचार करतात ५० वा विद्यार्थी म्हणून ह्याला पाठवू या ! घरी झोपा काढतो त्या ऐवजी तेथे जाऊन झोपा काढेल. ठरल्याप्रमाणे ते साधू त्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात तो ५० वा विद्यार्थी आपल्या सवयी प्रमाणे मागे भिंतीला टेकून झोपा काढत असतो.  हा ! हा ! म्हणता एक वर्ष होते .. साधू महाराज त्या मागे बसलेल्या ५० व्या विद्यार्थ्याला  उठवून पुढे आणून बसवायला सांगतात आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणतात,'' एक गॊष्ट लक्षात ठेवा ! ईश्वर चराचर आहे ... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22632)

pd - August 28, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ५१)

ID: 22634
अनामिकेसाठी आपण इतकी वर्षे वाया घालवली याचा आता विजयला पश्चाताप होऊ लागला होता. त्याच्या आयुष्यात आलेल्या इतक्या जणी त्याच्या आयुष्यातून ह्या ना त्या कारणाने दूर गेल्या त्याचे त्याला इतके दुःख झाले नाही जितके अनामिकेच्या जाण्याने होईल... कारण अनामिकेच्या बाबतीत त्याला असे वाटत होते कि त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचा नाते आहे . त्यामुळे काहीही झाले तरी त्यांचे मिलन हे होणारच ! मग अख्खं जग आडवं आलं तरी ! पण हे तोपर्यतरच वाटत होत जोपर्यत तिच्याही मनात त्याच्याबद्दल ओलावा आहे असे विजयला वाटत होते. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22634)

pd - August 29, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ५२)

ID: 22636
भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22636)

pd - August 30, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ५३)

ID: 22638
विजयने जितका पैसा कमावला तो सुरुवातीला भावंडांच्या शिक्षणात, वडिलांचे कर्ज फेडण्यात आणि त्या नंतर घरखर्चात त्याच्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणात आणि त्यांच्या आनंदात खर्च केला. तो खर्च करताना त्याला अपेक्षित होते कि त्याचे कुटूंब त्याच्यासाठी उभे राहील पण प्रत्यक्षता मात्र तसे झाले नाही. तोपर्यत वेळ निघून गेलेली होती. विजय आर्थिक दृष्ट्या अपंग झालेला होता. म्हणजे त्याला करावेसे तर खूप काही वाटत होते पण आर्थिक समस्येमुळे तो काहीच करू शकत नव्हता. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22638)

pd - August 31, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ५७)

ID: 22640
विजयच्या घराची बेल वाजल्यावर विजयने दरवाजा उघडला तर दरवाज्यात त्याच्या इमारतीतील काही तरुण गणपतीची वर्गणी गोळा करायला आले होते. विजयने सुरुवातील १०० रुपये वर्गणी दिली पण आम्ही सर्वांकडून १५१ रुपये वर्गणी घेत आहोत म्हटल्यावर विजयने आणखी ५१ रुपये वर्गणी दिली. वर्गणी देताना विजयला मनस्ताप वगैरे होत नाही. पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असावा असे विजयला प्रामाणिकपणे वाटते.त्यामुळेच विजय कोणालाही वर्गणी देताना कमीत कमीच देतो कारण एका वर्षी आपल्याला जास्त वर्गणी द्यायला परवडत असेल तरी ती द्यायला प्रत्येक वर्षी आपल्याला परवडेलच असे नाही ना ? माणसाने धार्मिक कार्यात सहभाग नोंदवायलाच हवा ! [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22640)

pd - September 4, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ६ )

ID: 22642
विजयच्या अनेक स्वप्नांपैकी गोव्याला जाणे हे ही एक स्वप्नच होते. पण त्याहून मोठे म्हणता येईल असे आणखी एक स्वप्न होते ते म्हणजे विमानप्रवास ! यावेळी विजय गोव्याला जाताना विमानाने गेला होता. कारण गोव्याचा संपूर्ण कार्यक्रम फक्त तीन दिवसांचा होता. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22642)

pd - January 26, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ७ )

ID: 22644
गोव्यावरून आल्यावरच विजयचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरस बेचव आणि निरुत्साही होऊ लागले कारण त्यावेळी विजयच्या जन्मकुंडली प्रमाणे विजयच्या जन्मपत्रिकेत तेंव्हा शनीची महादशा सुरू होती आणि त्याच काळात विजयची शनीची अंतर्दशाही सुरू झाली. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे oldsite
(PID -22644)

pd - January 27, 2022

md - January 14, 2026

Status - publish

एक परीस स्पर्श ( भाग – ८ )

ID: 64210
पूर्वी आलेल्या अनुभवातून विजय बरंच काही शिकला होता. म्हणून तो किंचित व्यवहारी आणि सावध झाला होता. पूर्वी तो लोकांमध्ये फक्त चांगुलपणा शोधायचा पण आता तो त्यांच्यातील हरामखोरपणाही शोधू लागला होता. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-निलेश बामणे oldsite
(PID -64210)

pd - January 28, 2022

md - March 25, 2026

Status - publish