साहित्य: पडवळ अर्धा कि., १ वाटी मोड आणून सोललेले वाल, १ वाटी कांदा, हिरव्या मिरच्या ६ ते ७ आले लसूण पेस्ट १ चमचा हळद, गूळ, धणा जिरा पावडर, तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मीठ, ओले खोबरे, कोथिंबीर
कृती: पडवळाच्या पातळ चकत्या करणे. कोवळ्या बिया असतील तर त्या घेणे वालालाब मोड आणून साले काढणे. एका पॅनमध्ये तेल घालून तेल तापल्यावर त्यात मोहरी घालणे व तडतडल्यावर कढीपत्ता घालणे बारीक चिरलेला कांदा घालणे. लालसर झाल्यावर त्यांत आले, लसूण पेस्ट १ चमचा घालणे. जरा परतवणे व त्यात वाल घालणे व चांगले सवताळून घेणे, त्यावर हळद, जिरा पावडर घालणे व थोडे पाणी घालून भांड्यावर झाकण ठेवावे व त्यावर पाणी घालून ठेवावेव थोड्या वेळात वाल शिजल्यावर भाजी घालावी व परतावी भाजी शिजत आल्यावर त्यात आपल्या आवडीनुसार गूळ व मीठ घालावे. भाजी शिजल्यावर त्यात खोबरे व कोथिंबीर घालावे पाणी ठेवू नये.
टिप: अश्या प्रकारे फरसबी व कारल्याची भाजी करतात.
- सौ. निलिमा सुनिल मेढेकर
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन