निष्ठावंत घोडे गद्दारीच्या शर्यतीत धावत नसतात,
इमानाच्या वाटेवर चालताना ते कधीच थकत नसतात.
वादळे येतात, वारे फिरतात,
स्वार्थासाठी कितीतरी चेहरे बदलतात.
पण ज्यांच्या रक्तात निष्ठा वाहते,
ते वेदना सहन करतात, पण विश्वास तोडत नसतात.
जिंकण्याची हौस त्यांनाही असते,
पण विश्वास विकून मुकुट मिळवत नसतात.
कारण पराभव चालतो त्यांना,
पण विश्वासघात कधीच रुचत नसतो.
सावलीसारखे साथ देणारेच खरे आपले,
उजेडात तर सगळेच सोबती असतात.
अंधारातही जे हात सोडत नाहीत,
तेच आयुष्याचे खरे साथीदार असतात.
म्हणून लक्षात ठेव...
निष्ठा ही तलवारीपेक्षा धारदार असते,
आणि इमानाने जगणाऱ्यांची ओळख
वेळ आली की आपोआपच होत असते.
निष्ठावंत घोडे गद्दारीच्या शर्यतीत धावत नसतात...
कारण त्यांना शर्यत जिंकायची नसते,
तर विश्वास जपायचा असतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
निष्ठावंत घोडे गद्दारीच्या शर्यतीत धावत नसतात,
इमानाच्या वाटेवर चालताना ते कधीच थकत नसतात.
वादळे येतात, वारे फिरतात,
स्वार्थासाठी कितीतरी चेहरे बदलतात.
पण ज्यांच्या रक्तात निष्ठा वाहते,
ते वेदना सहन करतात, पण विश्वास तोडत नसतात.
जिंकण्याची हौस त्यांनाही असते,
पण विश्वास विकून मुकुट मिळवत नसतात.
कारण पराभव चालतो त्यांना,
पण विश्वासघात कधीच रुचत नसतो.
सावलीसारखे साथ देणारेच खरे आपले,
उजेडात तर सगळेच सोबती असतात.
अंधारातही जे हात सोडत नाहीत,
तेच आयुष्याचे खरे साथीदार असतात.
म्हणून लक्षात ठेव…
निष्ठा ही तलवारीपेक्षा धारदार असते,
आणि इमानाने जगणाऱ्यांची ओळख
वेळ आली की आपोआपच होत असते.
निष्ठावंत घोडे गद्दारीच्या शर्यतीत धावत नसतात…
कारण त्यांना शर्यत जिंकायची नसते,
तर विश्वास जपायचा असतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 1