निशब्द स्पंदन

हातात तुझा हात,
निशब्द स्पंदन जागे.

मनाच्या खोल तळाशी
अव्यक्त लहरी हलती.

श्वासात तुझी चाहूल,
अंतरी सावली उजळे.

विरहाच्या राखेतून
नवे धगधगते बीज.

दुःखाच्या कडा झिजती,
आसवांत ऊन मिसळे.

हातात तुझा हात,
अनंत अर्थ उमटे.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे



हातात तुझा हात,
निशब्द स्पंदन जागे.

मनाच्या खोल तळाशी
अव्यक्त लहरी हलती.

श्वासात तुझी चाहूल,
अंतरी सावली उजळे.

विरहाच्या राखेतून
नवे धगधगते बीज.

दुःखाच्या कडा झिजती,
आसवांत ऊन मिसळे.

हातात तुझा हात,
अनंत अर्थ उमटे.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author