निर्मळ जीवन

जन्मोजन्मीचा हा जन्म मानवी
हसत सरावा उधळीत सुखाला

मनी नसावा भाव दुजेपणाचा
क्षणोक्षणी जपावे मनामनाला

साधेसुधे निर्मळ जीवन असावे
शांतवीणारे तनमनांतराला

भौतिक सुखदा ही क्षणभराची
असो शाश्वताचा ध्यास जीवाला

आत्ममुख आपण होत रहावे
उगा दोष देवू नये कुणाला

जीवाजीवा प्रेम देत जगावे
जगी जपत रहावे मानवतेला
********

-- वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908)

रचना क्र. ३२७

१०/१२/२०२२



जन्मोजन्मीचा हा जन्म मानवी
हसत सरावा उधळीत सुखाला

मनी नसावा भाव दुजेपणाचा
क्षणोक्षणी जपावे मनामनाला

साधेसुधे निर्मळ जीवन असावे
शांतवीणारे तनमनांतराला

भौतिक सुखदा ही क्षणभराची
असो शाश्वताचा ध्यास जीवाला

आत्ममुख आपण होत रहावे
उगा दोष देवू नये कुणाला

जीवाजीवा प्रेम देत जगावे
जगी जपत रहावे मानवतेला
********

— वि.ग.सातपुते (भावकवी)

(9766544908)

रचना क्र. ३२७

१०/१२/२०२२

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →