आजचा नवरात्रीचा नववा दिवस

आजचा नवरात्रीचा नववा दिवस

लसूण आणि मिरची वाटून एकत्र वाटून घ्या. वांग्याच्या फोडी करून पाण्यात टाका. कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापले की वाटलेली लसून-मिरची घाला. किंचित परता. त्यात वांग्याच्या फोडी पाणी निथळून घाला. नीट परतून झाकण घालून आच बारीक करून ठेवा. मधून मधून हलवत राहा. गरज असेल तर थोडे पाणी घालायला हरकत नाही. शेवटी मीठ, कोथिंबीर घालून नीट मिसळा. पळीने अगर मुसळीने भाजी घोटून एकजीव करा. शेवटी लिंबू पिळून परत एकदा घोटून घ्या. गरम पोळीबरोबर खा.



आज नवरात्रीच्या रंग –जांभळा(वांगी रंग)
आज जांभळ्या रंग असलेल्या वांग्याचे पदार्थ
खानदेशी लग्नातल्या पंगतीतली वांग्याची भाजी
साहित्य:-३-४ खानदेशात मिळणारी लहान हिरवी वांगी, २-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी-जास्त), ३-४ लसूण पाकळ्या, २-३ टेबलस्पून तेल, मुठभर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, १/२ लिंबू.
कृती:- लसूण आणि मिरची वाटून एकत्र वाटून घ्या. वांग्याच्या फोडी करून पाण्यात टाका. कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापले की वाटलेली लसून-मिरची घाला. किंचित परता. त्यात वांग्याच्या फोडी पाणी निथळून घाला. नीट परतून झाकण घालून आच बारीक करून ठेवा. मधून मधून हलवत राहा. गरज असेल तर थोडे पाणी घालायला हरकत नाही. शेवटी मीठ, कोथिंबीर घालून नीट मिसळा. पळीने अगर मुसळीने भाजी घोटून एकजीव करा. शेवटी लिंबू पिळून परत एकदा घोटून घ्या. गरम पोळीबरोबर खा.
टीपा – खानदेशात लसूण-मिरचीचा ठेचा लाकडाच्या बडगी-मुसळीत करतात. तीच मुसळी भाजी एकजीव करायला वापरतात. लहान वांग्याचे थोडे देठ ठेवले तर भाजी चांगली होते असे सगळे म्हणतात पण देठ खाताना तोंडात आलेले आवडत नसतील तर ते काढून भाजी केली तरी चालते.
लाल भोपळ्याची पण अशीच भाजी करतात. भोपळा गोडसर असल्याने हिरवी मिरची थोडी जास्त घालतात. पंगतीत पोळ्या मोडून त्याचा कुस्करा करतात. त्याचे आळे करून त्यात वरण तूप घालून सोबत ही भाजी असे खातात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

वांगे पावटे भाजी
साहित्य:- हिरवी वांगी पाव किलो , पावटे पाव किलो, तेल , मोहरी , जिरे , हळद, एक कांदा , एक टोमॅटो , लसूण पाकळ्या , कढीपत्ता. कांदा व टोमॅटो किसुन घ्यावे. तिखट , मीठ , गूळ , गरम मसाला / भाजी मसाला, दोन चमचे दही.
कृती:- पावटे उकडुन बाजुला ठेवा. थोड्या तेलात मोहरी व जिर्यायची फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या व कढीपत्ता घालावा.हळद घालावी. मग कांद्याचा कीस घालुन परतावे. मग टोमॅटो कीस घालुन परतावे. या मसाल्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजवावे. वांगी अर्धवट शिजली की उकडलेले पावटे घालावेत. थोडे पावटे क्रश करुन त्याची पेस्ट करुन घालावी. सर्व शिजले की मीठ , तिखट , गूळ व गरम मसाला घालावा. शेवटी गॅस बंद केला की दोन चमचे दही घालुन मिसळुन घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author