आज नवरात्रीचा सातवा दिवस

आपल्या हृदयावर राज्य करणारा रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे प्रेम, समतोल, ताजेपणा, वृद्धी, शीतलता आणि बरेच काही. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे, ‘ग्रीन सिग्नल’ देणे. बहुतेक लोकांचे स्वप्न असते की आपला एक टुमदार बंगला असावा व त्याला लागून छोटी का होईना हिरवीगार बाग असावी. किंवा फ्लॅट असला तरी आजूबाजूला झाडे असावीत.



आज नवरात्रीचा सातवा दिवस

आजचा नवरात्रीचा रंग हिरवा
आपल्या हृदयावर राज्य करणारा रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे प्रेम, समतोल, ताजेपणा, वृद्धी, शीतलता आणि बरेच काही. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे, ‘ग्रीन सिग्नल’ देणे. बहुतेक लोकांचे स्वप्न असते की आपला एक टुमदार बंगला असावा व त्याला लागून छोटी का होईना हिरवीगार बाग असावी. किंवा फ्लॅट असला तरी आजूबाजूला झाडे असावीत. माणसाची सुखाची कल्पना व हिरव्या रंगाचा फार जवळचा संबंध आहे. दिवाणखान्यात लावल्यास त्याचा शीतल रंग रात्री दमून आल्यावर थकवा घालवायला मदत करतो, तर बाथरूममध्ये पाण्याच्या सोबतीने छोटा निसर्ग आपल्या पायाशी आणून ठेवतो. झोपायच्या खोलीत तर हा रंग एकदमच परिपूर्ण ठरावा असा आहे. हिरव्या रंगामुळे डोळ्यांना थंडावा येतो व आपले स्नायू शिथिल होतात. याच कारणामुळे विश्रांतीच्या जागी हा रंग कुठल्या ना कुठल्या गोष्टींमार्फत आवर्जून वापरावा. मग हा रंग भिंतीवर असेल, पडद्यावर, पेंटिंगमध्ये किंवा शोभेच्या वस्तूंमध्ये. या रंगामुळे मन ताजेतवाने होते. जसा निळा रंग विश्वास संपादन करायला वापरतात तसेच कुठल्याही गोष्टीचा ताजेपणा सिद्ध करण्यासाठी हिरव्या रंगाला पर्याय नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

हिरव्या रंगाचे काही पदार्थ
पालक व लसूण रोल
साहित्य :- १ जुडी पाने साफ केलेला पालक, २ चमचे दही, अर्धा चमचा हळद पावडर, १ चमचा लाल तिखट, १/४ चमचा हिंग, ५-६ पाकळ्या लसूण (बारीक चिरलेला), १ चमचा जिरे, १-२ चमचे तेल, मीठ चवीनुसार.
रोलसाठी साहित्य:- १ वाटी तांदळाचे पीठ, १ चमचा तेल,
कृती:- एका भांडय़ात दही, हळद, तिखट, हिंग, लसूण, जिरे टाकून मिक्स करावे. २ चमचे तेल गरम करून त्यावर टाकावे. व सर्व मिक्स करावे. त्यात साफ केलेली पालकची पाने टाकून मिक्स करावे. मीठ चवीनुसार टाकावे. दुसऱ्या भांडय़ात तांदळाचे पीठ, मीठ, तेल व थोडेसे गरम पाणी टाकून कणकेसारखे पीठ मळावे. छोटे गोळे करून गोलसर लाटून घ्यावे. त्यात मिक्स केलेले पालकचे मिश्रण भरून रोल करावेत. हे रोल बटर पेपरमध्ये गुंडाळून मायक्रो हाय- मीडियमवर ३-४ मिनिटे ठेवावे. मायक्रोमध्ये पसरट काचेचे भांडे वापरावे. गरम गरम कुठल्याही स्वीट चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author