नाते असे जोडा लोकांशी
नित्य आठवण मनात,
कुणी बोला काही वागा काही
आनंद कायम राहो हृदयात..
निरपेक्ष करावी भक्ती
स्वामी सोडवतील चिंता,
करावे स्मरण मनात सदा
गजानन महाराज करतील कृपा..
ठेवावी नितांत भावपूर्ण श्रद्धा
अक्कलकोट असेल स्वामींचा वास,
घ्यावे दर्शन शेगावी गजानन महाराजांचे
राहील माथ्यावरी महाराजांचा कृपाहात..
— स्वाती ठोंबरे.
Author
Post Views: 6