नशा

“नशा”
नशा नशिली तूझ्या प्रेमाची,

अंग अंग सरसरली,

शृंगारले मन हे माझे,

जेव्हा तू घट्ट मिठी मारली !

मोहरुन सर्वांग आले,

तूझ्या एका स्पर्शाने,

ऊर दाटून आला,

तूझ्या रोमांचित गंधाने !

दिवानी मी तुझीच प्रियकरा,

पूर्णत्वाने वेडावलेस,

बांध फुटला भावनांचा,

कुशीत तुझ्या विसावले !

कवेत तू माझ्या अथांग,

मी तुला घट्ट कवटाळले,

‘ मिलन ‘ पीयुष पिण्यास,

उतावीळ मी, अधीर झाले !

– श्वेता संकपाळ.



“नशा”
नशा नशिली तूझ्या प्रेमाची,

अंग अंग सरसरली,

शृंगारले मन हे माझे,

जेव्हा तू घट्ट मिठी मारली !

मोहरुन सर्वांग आले,

तूझ्या एका स्पर्शाने,

ऊर दाटून आला,

तूझ्या रोमांचित गंधाने !

दिवानी मी तुझीच प्रियकरा,

पूर्णत्वाने वेडावलेस,

बांध फुटला भावनांचा,

कुशीत तुझ्या विसावले !

कवेत तू माझ्या अथांग,

मी तुला घट्ट कवटाळले,

‘ मिलन ‘ पीयुष पिण्यास,

उतावीळ मी, अधीर झाले !

– श्वेता संकपाळ.

Author