साहित्य: १ वाटी बारीक तांदूळ, १ नारळ, १ वाटी वरपर्यंत भरुन चिरलेला गुळ, ३ चमचे साजूक तूप, १ चमचा बेदाणे, १ चमचा बदामकाप, दोन वेलच्या, दोन लवंगा चिमूटभर मीठ, नारळाचे दुध काढण्यासाठी पाणी
तयारी : तांदूळ धुऊन निथळत ठेवावे. नारळ खवणून त्याचे तीन वाट्या दूध काढावे.
कृती : जाटसर भाड्यांत १ चमचा तूप घालून भांडे गॅसवर ठेवावे. तुप कडकडल्यावर त्यावर वेलच्या व लवंग ठेचून घालावा. त्यावर धुतलेले तांदुळ घालून परतून घ्यावे. नंतर ३ वाट्या नारळाचे दूध घालून परतून घ्यावे. नंतर ३ वाट्या नारळाचे दूध घालून भात शिजवून घ्यावा. कणी मोडताच त्यात १ वाटी भरुन गुळ घालावा. भात व गुळ एकत्र करावा. त्यात वेलची- जायफळ पावडर व बेदाणे आणि बदामकाप घालून दोन चमचे तूप घालून मंद आचेवर ठेवावा. गुळ विरघळेपर्यंत अधून मधून भात सारखा करावा. गॅसवर तवा ठेवून भांडे मंद गॅसवर १० मिनिटे ठेवावे, नारळी भात तयार.
- सुधा मोकाशी
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन