नंदेश्वर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जत ते मंगळवेढा हा १७१ क्रमांकाचा राज्यमहामार्ग या शहरातून जातो. या शहराला संतांची नगरी असेही म्हणतात. कारण, येथेच वारकरी संप्रदायातील संत बाळकृष्ण महाराज व संत कोंडिराम महाराज होऊन गेले. येथे रताळ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते म्हणून याला रताळ्याचे गाव म्हणूनही ओळखतात.
Author
Post Views: 29