नमन त्या प्रत्येक स्त्रीला

ती फक्त नावाने नाही “स्त्री”,
ती शक्ती आहे, ती माया आहे.
घराच्या प्रत्येक कोपऱ्यात
तिच्या प्रेमाची छाया आहे.

कधी आई बनून जपते जगाला,
कधी बहीण होऊन आधार देते.
कधी मुलगी बनून घर उजळते,
कधी पत्नी बनून संसार नेते.

तिच्या डोळ्यात असते स्वप्नांची दुनिया,
तिच्या मनात असते अपार धैर्य.
अडचणींना हसत सामोरी जाऊन
ती घडवते आयुष्याचे सुंदर भविष्य.

तिला नको दया, नको सहानुभूती,
तिला हवी फक्त समान ओळख.
कारण तिच्या पावलांमुळेच
जगाला मिळते नवी दिशा आणि शक्तीची झलक.

नमन त्या प्रत्येक स्त्रीला…
जी आयुष्याला सुंदर अर्थ देते...

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



ती फक्त नावाने नाही “स्त्री”,
ती शक्ती आहे, ती माया आहे.
घराच्या प्रत्येक कोपऱ्यात
तिच्या प्रेमाची छाया आहे.

कधी आई बनून जपते जगाला,
कधी बहीण होऊन आधार देते.
कधी मुलगी बनून घर उजळते,
कधी पत्नी बनून संसार नेते.

तिच्या डोळ्यात असते स्वप्नांची दुनिया,
तिच्या मनात असते अपार धैर्य.
अडचणींना हसत सामोरी जाऊन
ती घडवते आयुष्याचे सुंदर भविष्य.

तिला नको दया, नको सहानुभूती,
तिला हवी फक्त समान ओळख.
कारण तिच्या पावलांमुळेच
जगाला मिळते नवी दिशा आणि शक्तीची झलक.

नमन त्या प्रत्येक स्त्रीला…
जी आयुष्याला सुंदर अर्थ देते…

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author