नको नको रे.. झोपु

मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका “
गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका,
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll

भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे
रुपया घसरतोय.. घसरु दे
अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका,
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

लुटालूट, बलात्कार.. बघूच नका
रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका
नेत्यांचेच पाय धरा बोल त्यांचे खोडू नका,
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

त्यांचे सारेच चांगले.. बोलत रहा
आपले मत पैशाने.. तोलत रहा
कमरेवरचे सांभाळा ते मात्र सोडू नका,
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

खायला नसले चालेल.. पुतळे बांधा
नाड्या हरवल्या तर.. सूतळे बांधा
असे हवे तसे नको उगाच चर्चा झोडू नका,
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

तेच लिहिणार भाग्य.. वाईट काय
पीत रहा दिवस आणि नाईट काय
सारेच धुंदीत आहेत...ग्लास त्यांचे फोडू नका,
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

सर्व रक्त पिपासु भ्रष्ट अधिकारी आणी निर्लज्ज राजकीय नेत्यांना व झोपलेल्या जनतेला समर्पित।।

सारेच धुंदीत आहेत…ग्लास त्यांचे फोडू नका,
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

सर्व रक्त पिपासु भ्रष्ट अधिकारी आणी निर्लज्ज राजकीय नेत्यांना व झोपलेल्या जनतेला समर्पित।।

Author