नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा

कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले……



ब देशाचा राजा:- तुमचे नाणे दुप्पट वजनी असल्यामुळे आम्हाला एका नाण्यांसाठी दोन नाणे मोजावे लागतात.

अ देशाचा राजा:- आपले कारीगर , आमच्या येथे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या सारखे नाणे बनविणे शिकवू.
कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले.

कारीगराने नाणे बनविले, ब देशाच्या राजाने डोक्यावर हात मारला. शिकल्या प्रमाणे कारीगराने अ देशाचेच नाणे बनविले होते. आता ब देशाला अ देशाच्या एका नाण्यासाठी ४ नाणे द्यावे लागतात.

ज्याला कळला कथेचा अर्थ
तोच असेल खरा अर्थतज्ञ.

— विवेक पटाईत

Author