मूग पकोडे

मूग पकोडे – Recipe



साहित्य: -१ वाटी मुगाची डाळ (सालासकट) रात्री भिजत घालावी, २-३ हिरव्या मिरच्या, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, १ मोठा चिरलेला कांदा, १ चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरे पूड, १ चमचा धने पूड, १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तळण्याकरिता तेल.

कृती: – डाळ मिक्सरमधून वाटून घ्यावी. त्यामध्ये इतर सर्व साहित्य मिसळावे व जरा घट्टसर पीठ भिजवावे. चमच्याने लहान आकाराची भजी गरम तेलात टाकून तळून घ्यावीत. गरमच खाण्यास द्यावीत.

Author