आंस राहते सतत मनीं
मिळत नसते त्याचे साठी
प्रयत्न सारे होत असती
हाती नाही ते मिळविण्यापोटीं
प्रयत्न्यांत तो आनंद होता
धडपड होती, होती शंका
मिळविण्याच्या त्या लयीमध्यें
जिद्द मनाची आणिक हेका
यश मिळते जेव्हां पदरीं
धडपड सारी थंडावते
ज्याच्या करिता सारे सोशिले
त्यातील उर्मी निघून जाते
यशांत नाहीं आनंद तेवढा
मिळविण्यांत जो दिसून येई
कांहीं तरी ते मिळवावयाचे
ह्याच विचारी रमून जाई
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Author
Post Views: 9