मेणबत्ती

जळत होती मेणबत्ती,
मंद मंद प्रकाश देवूनी ।
अंधकार भयाण असतां,
भोवताली उजेड पाडूनी...१,

बुडत्यासाठी काडीचा आधार,
अंधारी भासली तशी प्रकाशीं ।
असूनी ज्योत मिणमिणती,
त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी....२,

वाटत नाहीं मूल्य कुणाला,
भरपूर पडल्या प्रकाशाचे ।
मेणबत्तीची ज्योत शिकवी,
साधे तत्त्व जीवनाचे....३

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



जळत होती मेणबत्ती,
मंद मंद प्रकाश देवूनी ।
अंधकार भयाण असतां,
भोवताली उजेड पाडूनी…१,

बुडत्यासाठी काडीचा आधार,
अंधारी भासली तशी प्रकाशीं ।
असूनी ज्योत मिणमिणती,
त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२,

वाटत नाहीं मूल्य कुणाला,
भरपूर पडल्या प्रकाशाचे ।
मेणबत्तीची ज्योत शिकवी,
साधे तत्त्व जीवनाचे….३

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author