मतदानाचा हक्क – एक कविता

मतदानाचा हक्क मी आज बजावला आहे
लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे ||



मतदानाचा हक्क मी आज बजावला आहे
लोकशाहीवर माझा पूर्ण विश्वास आहे ||

भलतेच विचार मनात येतात कित्येकदा ह्या मताचे
आपल्या एका मताने काय असा फरक पडणार आहे ?

तरीही वाटते हक्क मतदानाचा प्रत्येकाने बजावलाच पाहिजे
मग कुठे सरकारला जाब विचारण्याचा नैतिक अधिकार आहे ||

रविंद्र कामठे
९८२२४ ०४३३०

— रविंद्र कामठे

Author