साहित्य: १५-२० मशरूम उभे चिरून, १ मोठा कांदा चौकोनी बारीक चिरलेला, · ३ टे.स्पून लोणी किंवा तेल, ५ कप चिकन स्टॉक, १ टे.स्पून ड्राय शेरी, (ऐच्छिक) मीठ, मिरेपूड चवीप्रमाणे.
कृती: , वेळ: २० मिनिटे एका पातेल्यात लोणी गरम करावे. वितळल्यावर त्यात कांदा परतावा. कांदा मऊ झाल्यावर त्यात मशरूमचे तुकडे घालावेत आणि जरा परतावे. मीठ, मिरे पावडर घालून गॅस बारीक करावा. त्यावर झाकण ठेवावे. मशरूम शिजल्यावर त्यात चिकन स्टॉक व शेरी घालावी. उकळी आल्यावर गॅस बंद करून झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी उतरवावे. गरम गरम सूप प्यायला द्यावे. त्यात एका अंड्याचे पातळ ऑमलेट करून त्याची गुंडाळी करून सुरीने पातळ चिरून शेवेसारखी वरून पसरवावी. (चिकन स्टॉक नसल्यास चिकनच्या २ क्यूबज वापराव्यात.)