साहित्य: ४ कप चिकन स्टॉक, ८-१० बटणं मशरूम, १ कांदा, पाव टी स्पून किसलेले आले, २ टे. स्पून लोणी, १ टे.स्पून कॉर्नफ्लोअर, पाव कप दूध, मीठ, काळेमिरे पावडर,
कृती: वेळ: : २५ मिनिटे कांदा उभा पातळ चिरावा, ताजे मशरूम्स धुऊन उभे पातळ चिरावेत. थोडे मशरूम्स बाजूला काढून ठेवावे. पातेल्यात थोडे लोणी तापवून त्यात कांदा चांगला परतावा. त्यात मशरूम्स घालून परतावे. किसलेले आले घालावे. कॉर्नफ्लोअरची दुधात पेस्ट करून घालावी व चमच्याने चांगले ढवळत शिजवावे. नंतर थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. न गाळता चिकन स्टॉकमध्ये मिसळून उकळत ठेवावे. मीठ, मिरे पावडर चवीनुसार घालावी. बाजूला काढून ठेवलेले मशरूम्स उभे पातळ चिरून तळावे व सुपावर घालून द्यावे. बाऊलमध्ये सुपावर थोडी कोथिंबीर व चीज किसून घालावे.