मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी, मर्यादेतचि जगती सारे ।
अनंत असता ईश्वर , मर्यादा घाली त्यास बिचारे ।।

जाण जगाची होई इंद्रियांनी, त्याला असती मर्यादा ।
विचार सारे झेपावती, ज्ञान शक्ती बधूनी सदा ।।

अथांग वाटे विश्वमंडळ, दाही दिशांचा भव्य पसारा ।
ईश्वर आहे थोर त्याहूनी, मोजमापाच्या उठती नजरा ।।

कशास करीतो तुलना सारी, भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी ।
अज्ञानाने पडती मर्यादा, अनंत तत्वास त्याच क्षणी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author