मराठी चित्रपट अभिनेते संदीप कुलकर्णी

`डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

`डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

संदीप कुलकर्णी यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६४ पुणे येथे झाला.

पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या “श्वास” आणि “डोम्बिवली फास्ट” या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘अवंतिका’ मालिकेत त्यांनी काम केले होते. मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकार ही आहेत. बेधुंद, ‘मी बाप’, ‘मेड इन चायना ‘ आणि ‘साने गुरुजी’ या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला.

२००८ मध्ये नायजेरियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुलकर्णी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

Author