चित्रपट व नाट्य अभिनेत्री रसिका जोशी

रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या.



मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री रसिका जोशी यांचा जन्म १२ सप्टेंबर १९७२ रोजी झाला.

त्यांनी मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला.

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला. रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या.

यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचे कथा आणि संवाद लेखन त्यांनी केले होते. गायब, वास्तुशास्त्र, भूत अंकल, भुलभुलय्या, मालामाल वीकली, जॉनी गद्दार, बिल्लू बार्बर, खलबली या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही त्यांनी अभिनय केला.

रसिका जोशी यांचे ७ जुलै २०११ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →