मनी भाव अंतरी तुमचा ठाव
सद्गुरु महाराज तुमचेच नाम
२१ अध्याय पूर्ण पारायण होता
महाराज तुमची कीर्ती अनादी अनंता
गण गण गणात बोते मंत्र प्रभावी
चिंता सोडवी सद्गुरुच्या पायापाशी
बंकटलालासी तुम्ही प्रथम दर्शन दिले
शेगाव नगरी प्रति पंढरपुर झाले
प्रत्येक अध्याय वाचता मनोभावे
संकट निवारण होतील सहज सारे
नसे मागणे महाराज तुमच्यापाशी
अज्ञान बालक मी घ्या तुमच्या चरणापाशी
नतमस्तक मी नमन करते तुम्हांसी
द्यावा आशीर्वाद प्रत्येक भक्तांसी
— स्वाती ठोंबरे.
Author
Post Views: 55
