मंगलदेशा, पवित्र देशा !

मंगल देशा । पवित्र देशा । महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा । धृ. ।।
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।
अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा ।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा ।।
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,
व्यवहारा परमार्थासी वैभवासि वैराग्यासी ।।
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।१॥।

Authors