अनोळखी तूं परी
मन हे बेचैन होई
शोध शोधीते तुला
बघ ही मृगनयनी ।।धृ।।
चाहूल लागतां
थबकती पाऊले
मन भिरभरते
प्रीत अधीर लोचनी ।।१।।
प्राजक्त प्रितीचा
मोहरला अंगणी
गंधाळते सुगंधा
तुझ्या स्मृतीमधुनी ।।२।।
रुपडे तुझे लाघवी
वसले या लोचनी
नाते जन्मोजन्मीचे
मर्मबंधी खेळ जीवनी ।।३।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.११५.
२५ – ८- २०२१.
Author
Post Views: 10