मालविकाग्निमित्रम्

कविकुलगुरू कालिदासकृत सुखांत नाटक. याचे पाच अंक आहेत. या नाटकाचा काळ निश्चित सांगता येत नसला तरी कालिदासाचे हे पहिले, त्यांनी आपल्या तरुण वयात लिहिलेले नाटक असावे असे सामान्यतः मानले जाते.



कविकुलगुरू कालिदासकृत सुखांत नाटक. याचे पाच अंक आहेत. या नाटकाचा काळ निश्चित सांगता येत नसला तरी कालिदासाचे हे पहिले, त्यांनी आपल्या तरुण वयात लिहिलेले नाटक असावे असे सामान्यतः मानले जाते.

या नाटकात विदर्भ देशाचा राजा यज्ञसेन आणि त्याचा चुलतभाऊ माधवसेन यांच्यातील विदर्भाच्या गादी संबंधीचा कलह, यज्ञसेना ने माधवसेनाला कैदेत टाकने त्यावरून अग्निमित्राने विदर्भावर स्वारी करण्याचा, आपल्या सेनापतीला हुकूम देणे, विदर्भाधीपतीचा पराभव,नंतर विदर्भाचे दोन भाग पाडून यज्ञसेन आणि माधवसेन यांना एक एक भाग देणे,अग्निमित्र आणि धारणी यांचा पुत्र वसुमित्र याने अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवणाऱ्या यवणांना पराभूत करणे,इत्यादी ऐतिहासिक घटना पार्श्वभूमी सारख्या आलेल्या आहेत.

कालिदासाच्या या नाटकाचा नायक ऐतिहासिक आहे. शेवटच्या मौर्यसम्राटाला ठार मारून त्याच्या गादीवर बसणारा त्याचा सेनापती पुष्पमित्रांने अश्वमेघ यज्ञ केला होता. वसुमित्राने यवनांचा केलेला पाडाव, विदर्भाच्या राजाचा पराभव, त्यांच्या राज्याची वाटणी, त्यांच्या घराण्यातील राजकन्येशी अग्निमित्रा चा विवाह, त्या घटना ऐतिहासिक आहेत. नाटकासाठी आवश्यक त्या ऐतिहासिक घटनांची माहिती कालिदासाला काही पद्यमय प्रबंधावरून झाली असणे शक्य आहे.

ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणारे पद्य प्रबंध भारतात प्राचीन काळापासून रचले जात होते. या नाटकाचे संविधानक थोडे गुंतागुंतीचे असले तरी त्यांची मांडणी कालिदासांनी नेटकेपणाने केलेली आहे शृंगार हा नाटकातला मुख्य रस आहे. वैचित्र्यपूर्ण प्रसंग निर्माण करून नाटकाची रंगत वाढवत नेली आहे. नाटकातील घटनांचा काळ अल्प म्हणजे काही महिन्यांचा असल्यामुळे त्यातील कथा विकासाला फारसा अवकाश मिळालेला नाही.

या नाटकातील विदूषक अत्यंत चतुर, मुत्सद्दी आणि कालिदासांच्या अन्य नाटकातील विदूषकापेक्षा वेगळा आहे. नाटकातील घटनांवर त्याचा प्रभाव स्पष्टपणे पडलेला आहे. याशिवाय या नाटकात सम्राट पुष्पमित्र शुंग याने केलेल्या राजसूय यज्ञाचे हे वर्णन आहे. मालविकाग्निमित्रम् हे कालिदासाने लिहिलेले नाटक सम्राट अग्निमित्र आणि त्याच्या राणीची दासी मालविका यांच्यातील प्रेम कथेचे चित्रण असलेले हे नाटक कालिदास त्यांचे पहिले नाटक मानले जाते. अग्निमित्र एका दासीचे चित्र पाहून त्यावर मोहित होतो. आपल्या दरबारातील विदूषकाच्या सहाय्याने तो तिला मिळवण्याचा प्रयत्न करतो. मालविका नावाची ही मुलगी राणीची दासी असते. राणीला जेव्हा अग्निमित्राच्या मालविके वरील प्रेमाचा संशय येतो. तेव्हा ती अतिशय क्रोधित होऊन मालविकेस कैदेत टाकते.काही काळाने असे कळून येते की मालविका ही दासी नसून ती एक राजकन्या आहे. यानंतर अग्निमित्र तिच्याशी लग्न करून तिला आपली राणी करतो. ऐतिहासिक कथानक संवादाला योग्य अशी लहान सुटसुटीत वाक्य, सोपी भाषा या वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या तुम्ही प्रेमात पडाल असे हे नाटक आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ते वाचून पहावे ते नाटक म्हणजे मालविकाग्निमित्रम्!

प्रतीक्षा संजय धानोरकर
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
(बी ए द्वितीय वर्ष)
दि. ३०. ०३. २०२२

Author