मराठीतल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर

मालतीबाई बेडेकरांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. त्यांचा जन्म १८ मार्च १९०५ आवास, रायगड येथे झाला. विश्राम बेडेकरांशी १९३८ साली त्यांचा विवाह झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या. 'महिला सेवाग्राम'शी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सह्रदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दु:खी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दु:खालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता 'विभावती शिरुरकर' या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं. अलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा 'कळयांचे नि:श्वास' हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. 'हिंदोळयावर', 'विरलेले स्वप्न', 'बळी', 'जाई', 'शबरी', या कादंबर्या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. 'पारध', 'हिरा जो भंगला नाही', ही नाटकं, 'घराला मुकलेल्या स्त्रिया' हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि 'स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन' हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लिखाण आहे. त्यांच्या 'बळी' 'शबरी ' आणि 'घराला मुकलेल्या स्त्रिया' या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्यां ची गुजराथीत भाषांतरे झाली आहेत. मा.मालती बेडेकर यांचे ७ मे २००१ साली निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट



मालतीबाई बेडेकरांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. त्यांचा जन्म १८ मार्च १९०५ आवास, रायगड येथे झाला. विश्राम बेडेकरांशी १९३८ साली त्यांचा विवाह झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या. ‘महिला सेवाग्राम’शी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सह्रदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दु:खी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दु:खालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता ‘विभावती शिरुरकर’ या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं. अलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा ‘कळयांचे नि:श्वास’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. ‘हिंदोळयावर’, ‘विरलेले स्वप्न’, ‘बळी’, ‘जाई’, ‘शबरी’, या कादंबर्या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. ‘पारध’, ‘हिरा जो भंगला नाही’, ही नाटकं, ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि ‘स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन’ हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लिखाण आहे. त्यांच्या ‘बळी’ ‘शबरी ‘ आणि ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्यां ची गुजराथीत भाषांतरे झाली आहेत. मा.मालती बेडेकर यांचे ७ मे २००१ साली निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →