कृती: एका मोठ्या पातेल्यात चिकन स्टॉक उकळत ठेवावा. उकळी आल्यावर त्यात चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. ५-७ मिनिटे चांगले उकळले की त्यात सोयासॉस, व्हिनेगर, आजिनोमोटो, मिरे पावडर, मीठ घालावे. भाज्या थोड्या शिजल्या, की त्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून चमच्याने ढवळावे व शेवटी अंडे एका वाटीत फेसून घ्यावे. उकळत्या सूपात फेसलेले अंडे बारीक धारेने ओतावे. ओतताना एका हाताने ढवळत राहावे म्हणजे अंड्याचे तुकडे तुकडे दिसणार नाहीत. अंडे टाकल्यानंतर गॅस बंद करावा. सूप गरमच प्यायला द्यावे. देताना वरून थोडी कोथिंबीर पसरवावी. अंडे आवडत नसल्यास फक्त कोथिंबीर घालून प्यायला द्यावे.