ललितकलादर्श नाट्य संस्थेचा वर्धापनदिन

वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.



३ जानेवारी १९०८ रोजी ‘संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी ‘ललितकलादर्श’ या नाट्य संस्थेची वयाच्या अठराव्या वर्षी स्थापना केली.

१ जानेवारी १९०८ रोजी, वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

संगीत मदालसा, संगीत दामिनी ही पुढची नाटकंही बरीच गाजली. वन्स मोअर घेत घेत केशवराव अख्खी रात्र प्रेक्षकांना गुंगवून ठेवत. आनंदराव मेस्त्री, बाबुराव पेंटर यांचं नेपथ्यही चर्चेचा विषय झालं होतं.

१९१३ साली वीर वामन जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकात प्रथमच कंपनीनं लाल, मखमली पडदा वापरला. असे अनेक पायंडे कंपनीनं पुढे पाडले, अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →