फणसाच्या आठळ्यांचे लाडू
साहित्य :- वाटीभर फणसाच्या आठळया , अर्धी वाटी साजूक तूप , वाटीभर साखर ,एक छोटा चमचा वेलदोडयाची पूड ,चिमूटभर जायफळाची पूड ,एक छोटा चमचा मीठ.
कृती :- प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या पाण्यात घालून मायक्रोवेव्हमधून उकडून घ्या आणि थंड झाल्यावर सोलून घ्या व मिक्सरवर फिरवून घ्या. नंतर गॅसवर एका नॉनस्टिक कढईत साजूक तुपावर खमंग होईतोंवर व सोनेरी रंग येईतोवर परतून घ्या. आता गॅसवर एका भांड्यात वाटीभर साखरेचा दोन तारी पाक करून घ्या,त्या पाकात वेलदोडयाची पूड व जायफळाची चिमूटभर पूड घालून ढवळून घेऊन मग आठल्याचे तुपावर भाजून घेतलेले व मिक्सरमधून फिरवून तयार केलेले आठळ्यांचे पीठ घाला व झार्याेने हलवून /ढवळून घ्या व गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासाने मिश्रण थंड व घट्ट झाल्यावर साजूक तुपाच्या हाताने लाडू वळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तांदळाचे लाडू
साहित्य:- चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी तीळ, एकवाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तूप, वेलदोडे पूड.
कृती:- तांदूळ चांगले बदामी रंगावर भाजावेत, गरम असतानाच तांदूळ धुऊन पसरून वाळवावेत. वाळल्यावर दळून आणावेत. दोन चमचे तुपावर गूळ घालून पाक करावा. गूळ विरघळला की भाजेलेले तीळ, खोबरेकीस, वेलदोडे पूड घालावी. तांदूळपीठ घालून मिसळावे. उरलेले तूप पातळ करून घालावे. लाडू वळावेत वेगळ्या चवीचे लाडू पीठ असले की पटकन करता येतात. पौष्टिक आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
खजूर पनीर लाडू
साहित्य:- २०० ग्रॅम किसलेले पनीर, २०० ग्रॅम सिडलेस खजूर,दोन वाट्या पिठीसाखर,अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, एक वाटी फ्रेश क्रीम, अर्धा चमचा वेलदोडा पावडर , अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट.
कृती:- प्रथम खजूर चिरुन घेऊन मिक्सरमधुन बारीक करावा. एका फ्राय पॅनमध्ये फ्रेश क्रीम घालून त्यात खजुराचा मिक्सरवर करून घेतलेला लगदा, ओल्या नारळाचा चव (खोबरे) आणि किसलेले पनीर हे सर्व घालुन नीट परतुन घ्यावे. उतरवुन कोमट झाले की त्यात पिठीसाखर अन वेलची पुड घालुन लाडु वळावे. अन थोड्या डेसिकेटेड खोबर्याकच्या किसात घोळवुन घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
अळशीचे (जवसाचे) लाडू
साहित्य:- एक वाटी अळशी (जवस),एक वाटी काळे तीळ,एक वाटी खसखस,३-४ टेबलस्पून डिंक पावडर,एक वाटी बदामाचे काप, दोन वाट्या कणीक, ३-४ वाट्या ताजा खवा, एक वाटी साजूक तूप, तीन वाट्या साखर.
कृती:- गॅसवर एक कढई गरम करून घ्या व त्या गारा कढईत मध्यम आंचेवर जवस, काळे तीळ आणि खसखस तीनही स्वतंत्रपणे वेगवेगळे खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर तीनही वेगवेगळे ग्राईंडरवर वाटून घ्या. (वेगवेगळे वाटण्याचे कारण असे की तीळ सगळ्यात लवकर बारीक वाटले जातात तर खसखस बारीक वाटायला सगळ्यात जास्त वेळ लागतो) नंतर त्याच गरम कढईत साजूक तुपात डिंकाची पावडर तळून घ्या. आता त्याच कढईत शिल्लक तुपात कणीक घालून मध्यम आंचेवर कणीक ५-७ मिनिटे लालसर रंगावर परतून/भाजून घ्या. एका मोठ्या परातीत भाजलेली कणीक काढून घ्या व त्यात साजूक तुपात तळलेली डिंकाची पावडर आणि मिक्सरवर वाटून घेतलेले जवस, काळेतीळ आणि खसखस घालून चांगले मिक्स करा. आता त्या भाजलेल्या कणकेच्या कढईतच खवा घाला आणि सोनेरी लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा गरम खरपूस व खमंग भाजलेला खवा आता त्या कणकीत घाला आणि साखरही घालून सगळे पुन्हा एकदा चांगले हलवून मिक्स करा. उलथण्याने खालीवर करत रहा. साखर मिश्रानांत विरघळली की त्यातील एक मोठा चमचाभर मिश्रण तूप लावलेल्या हातात घ्या आणि दुसर्यास हाताच्या बोटांनी त्याचा गोल आकार देत लाडू वळा. याच प्रकारे बाकीचे सगळे लाडू वळून घ्या आणि थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
शेवयाचे लाडू
साहित्य : २०० ग्रॅमचे हातशेवयांचे एक पाकिट, दीड वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धा कप सायीसकट दुध, १२-१५ बेदाणे, एक छोटा चमचा वेलची पूड,४-५ केशराच्या काड्या (दुधात खालून व शिजवून), दोन टेबलस्पून साजूक तूप.
कृती : एका फ्राय पॅनमध्ये साजूक तुपावर ओल्या नारळाचा चव थोडा परतुन घ्यावा, त्यातच शेवटी-शेवटी शेवया बारीक चुरुन घालुन त्याही परटुन्न घ्याव्या. दरम्यान दुसरीकडे एका पातेल्यात साखरेत दुध घालुन एक तारी पाक करुन घ्यावा. त्यात हे नारळ शेवईचे परतून ठेवलेले मिश्रण व वेलची पूड आणि दुधात सीजवलेल्या केशराच्या काड्या घालुन अर्धा तास मुरु द्यावे. नंतर थंड झालेल्या मिश्रणाचे तुपाच्या हाताने बेदाणे लावून लाडू वळावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३