कोटि कोटि ब्रम्हांडनायका

कोटि कोटि ब्रम्हांडनायका
तूच जगाचा पालनकर्ता
तूच विधाता रक्षणकर्ता
श्री स्वामी समर्था गजानना ... १

तू भयहारक तू भवतारक
तूच आमुचा एक भरोसा
तूच स्वामी तू एक नियंता
श्री स्वामी समर्था गजानना ... २

तू ज्ञानदेव तू अवतारी
चराचरामधी तू अविनाशी
तूच सखा तू भाग्यविधाता
श्री स्वामी समर्था गजानना ... ३

मुक्ती देशी तू या भवपाशा
अनंत तू फुलविशी आशा
भक्ति मुक्तीच्या दाविशी वाटा
श्री स्वामी समर्था गजानना ... ४

तूच आमची माय माऊली
तूच आमची एक साऊली
तू माता तू पिता आमुचा
श्री स्वामी समर्था गजानना ... ५

तुझी कृपा अन तुझे छत्र शिरी
तुझी पाठिशी असे साऊली
संकटकाळी रक्षण करिशी
श्री स्वामी समर्था गजानना ... ६

-- विनायक अत्रे



कोटि कोटि ब्रम्हांडनायका
तूच जगाचा पालनकर्ता
तूच विधाता रक्षणकर्ता
श्री स्वामी समर्था गजानना … १

तू भयहारक तू भवतारक
तूच आमुचा एक भरोसा
तूच स्वामी तू एक नियंता
श्री स्वामी समर्था गजानना … २

तू ज्ञानदेव तू अवतारी
चराचरामधी तू अविनाशी
तूच सखा तू भाग्यविधाता
श्री स्वामी समर्था गजानना … ३

मुक्ती देशी तू या भवपाशा
अनंत तू फुलविशी आशा
भक्ति मुक्तीच्या दाविशी वाटा
श्री स्वामी समर्था गजानना … ४

तूच आमची माय माऊली
तूच आमची एक साऊली
तू माता तू पिता आमुचा
श्री स्वामी समर्था गजानना … ५

तुझी कृपा अन तुझे छत्र शिरी
तुझी पाठिशी असे साऊली
संकटकाळी रक्षण करिशी
श्री स्वामी समर्था गजानना … ६

— विनायक अत्रे

Author