पुनवेच्या चांदण्यात
भिजलो नाही कधी
अवसेच्या अंधाराला
कवटाळले सदा.
डोळ्यातलं तिचे प्रेम
दिसलं नाही कधी.
भोवर्यातच वासनेच्या
भटकत राहिलो सदा.
प्रेमाचा अर्थ मला
कळला नाही कधी.
समुद्रात प्रेमाच्या
कोरडाच राहिलो सदा
— विवेक पटाईत
Author
Post Views: 17