कितीक तुझ्यात गुंतून गेले

कितीक तुझ्यात गुंतून गेले
भावुक वेल्हाळ मी झाले,
अशी कशी अवखळ झाले
अलगद भान हरपून बसले
काहूर उठता अंतर मनी
प्रश्न पडतील वेगवेगळी,
तू कितीक दूर दूर जाशी
तितकी जखम खोल हृदयी
रानावनात रान गाणी
रमते अल्लड मग फुलराणी,
निःशब्द भाव साऱ्या आठवणी
न विसरली तुला अबोल अबोली
मदमस्त वारा बेफाट होई
तुझी आठवण कातर क्षणी,
न कळली तुला अवखळ गाणी
का जीव गुंततो नाजूक वेळी
ती मुग्ध मोहक मधुर मिठी
पडली भूल कशी अवेळी,
हे मन बावरे अवखळ होई
अबोली अबोल होईल हृदयी
-- स्वाती ठोंबरे.


कितीक तुझ्यात गुंतून गेले
भावुक वेल्हाळ मी झाले,
अशी कशी अवखळ झाले
अलगद भान हरपून बसले
काहूर उठता अंतर मनी
प्रश्न पडतील वेगवेगळी,
तू कितीक दूर दूर जाशी
तितकी जखम खोल हृदयी
रानावनात रान गाणी
रमते अल्लड मग फुलराणी,
निःशब्द भाव साऱ्या आठवणी
न विसरली तुला अबोल अबोली
मदमस्त वारा बेफाट होई
तुझी आठवण कातर क्षणी,
न कळली तुला अवखळ गाणी
का जीव गुंततो नाजूक वेळी
ती मुग्ध मोहक मधुर मिठी
पडली भूल कशी अवेळी,
हे मन बावरे अवखळ होई
अबोली अबोल होईल हृदयी
— स्वाती ठोंबरे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →