काय मिळालं मला
काय मिळालं तुला
सल राहिली मनात
आठवण राहिली हृदयात..
काय मिळालं मला
काय मिळालं तुला
अबोल झाल्या जाणिवा
निःशब्द उरल्या भावना..
काय मिळालं मला
काय मिळालं तुला
वेदना मिळाल्या मला
दुःख उरले अंतःकरणात..
— स्वाती ठोंबरे.
Author
Post Views: 11