कळ्या नाजुकशा,
फुलल्या तुझ्यासाठी,--!!!
गगनी चांदण्या,
आल्या तुझ्यासाठी,--!!!
घमघमणाऱ्या केवड्या,
सुगंध तुझ्यासाठी,--!!!
आरक्त प्राजक्ता,
पखरले तुझ्यासाठी,--!!!
दिमाखदार चाफ्या,
लुटले तुझ्यासाठी,--!!!
मदमस्त मोगऱ्या,
खुडले तुझ्यासाठी,--!!!
बकुळां,अर्धमिटल्या,
वेचले तुझ्यासाठी,--!!!
सायलीच्या सुगंधा,
मोहित तुझ्यासाठी,--!!!
अबोलीच्या वेण्या,
माळल्या तुझ्यासाठी,--!!!
मंद- मंद रातराण्या,
उमलल्या तुझ्यासाठी,--!!!
यामिनीला ढळत्या,
मातले तुझ्यासाठी,--!!!
आलिंगनात तुझ्या,
सहज विरघळण्यासाठी,--!!!
© हिमगौरी कर्वे
कळ्या नाजुकशा,
फुलल्या तुझ्यासाठी,–!!!
गगनी चांदण्या,
आल्या तुझ्यासाठी,–!!!
घमघमणाऱ्या केवड्या,
सुगंध तुझ्यासाठी,–!!!
आरक्त प्राजक्ता,
पखरले तुझ्यासाठी,–!!!
दिमाखदार चाफ्या,
लुटले तुझ्यासाठी,–!!!
मदमस्त मोगऱ्या,
खुडले तुझ्यासाठी,–!!!
बकुळां,अर्धमिटल्या,
वेचले तुझ्यासाठी,–!!!
सायलीच्या सुगंधा,
मोहित तुझ्यासाठी,–!!!
अबोलीच्या वेण्या,
माळल्या तुझ्यासाठी,–!!!
मंद- मंद रातराण्या,
उमलल्या तुझ्यासाठी,–!!!
यामिनीला ढळत्या,
मातले तुझ्यासाठी,–!!!
आलिंगनात तुझ्या,
सहज विरघळण्यासाठी,–!!!
© हिमगौरी कर्वे