काय हाती सरतेशेवटी

काय हाती सरतेशेवटी,
जीवन पुढे पुढे जाते,
करत रहावी पुढची बेगमी,
पैलाची वाट बोलावते,--!!!

या तीरावरून त्या तीरी,
पोहोचणे असते का सोपे,
ऐलाची हाक सतत कानी,
मध्ये उगी खेचती भोवरे,--!!!

ऐहिकाची ओढ राही,
पाणी ढकलत राहते,
लौकिकाचा छळ नशिबी,
तनमन गटांगळ्या खाते,--!!!

स्वर्गच जणू पैलतीरी,
नरकातून वाहत जाणे,
सुख- दु:खांनी श्वास कोंडती, हेलकाव्यांचेच ते जिणें,--!!!

मरण येत नाही म्हणुनी,
असेच जगत राहायचे,
भगवंताचा वास ठिकाणी,
आता त्या पोहोचायाचे,--!!!

नको भावनांचे जाळे,
नको जाणीव संवेदनांची,
दुरून दत्तगुरुंना पाहणे,
आंस राहिली फक्त हृदयाची,

नको नात्यांचे विष पचवणे,
हलां- हलां त्या द्यावे सोडूनी,
अजून त्यांना किती रिचवणे,
ताकद आता सर्व संपली,--!!!

© हिमगौरी कर्वे.



काय हाती सरतेशेवटी,
जीवन पुढे पुढे जाते,
करत रहावी पुढची बेगमी,
पैलाची वाट बोलावते,–!!!

या तीरावरून त्या तीरी,
पोहोचणे असते का सोपे,
ऐलाची हाक सतत कानी,
मध्ये उगी खेचती भोवरे,–!!!

ऐहिकाची ओढ राही,
पाणी ढकलत राहते,
लौकिकाचा छळ नशिबी,
तनमन गटांगळ्या खाते,–!!!

स्वर्गच जणू पैलतीरी,
नरकातून वाहत जाणे,
सुख- दु:खांनी श्वास कोंडती, हेलकाव्यांचेच ते जिणें,–!!!

मरण येत नाही म्हणुनी,
असेच जगत राहायचे,
भगवंताचा वास ठिकाणी,
आता त्या पोहोचायाचे,–!!!

नको भावनांचे जाळे,
नको जाणीव संवेदनांची,
दुरून दत्तगुरुंना पाहणे,
आंस राहिली फक्त हृदयाची,

नको नात्यांचे विष पचवणे,
हलां- हलां त्या द्यावे सोडूनी,
अजून त्यांना किती रिचवणे,
ताकद आता सर्व संपली,–!!!

© हिमगौरी कर्वे.

Author