जीवनाची उपयोगिता

दहा पंधरा तीं वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची

मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जी जीवनाची....१,

वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरिर कुणाला,

मना मारूनी बसावे लागे, ईश्वरी नाम घेत सर्वाला....२,

निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन

दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,

बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले

दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व ते आज जाणले....४,

जेंव्हां करितो स्वत: करिता, स्वार्थी भाव तो लपला असे

दुजासाठी ते करिता सारे , स्वार्थी भाव ते राहील कसे ?....५,

शेवटचे ते सरते जीवन, प्रभू चरणी ते समर्पण व्हावे

हात जोडूनी विनंती करतो, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

दहा पंधरा तीं वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची

मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जी जीवनाची….१,

वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरिर कुणाला,

मना मारूनी बसावे लागे, ईश्वरी नाम घेत सर्वाला….२,

निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन

दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून…३,

बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले

दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व ते आज जाणले….४,

जेंव्हां करितो स्वत: करिता, स्वार्थी भाव तो लपला असे

दुजासाठी ते करिता सारे , स्वार्थी भाव ते राहील कसे ?….५,

शेवटचे ते सरते जीवन, प्रभू चरणी ते समर्पण व्हावे

हात जोडूनी विनंती करतो, दुजाच्या सेवेतच निघून जावे…६

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author